कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठा झटका, पालिकेतील गटनेत्याचा भाजपात प्रवेश

राजेश कदम, मंदार हळबे या सारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का

कल्याण-डोंबिवलीत मनसेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कालच डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला डोंबिवलीत धक्का बसला होता.

राजेश कदम, मंदार हळबे या सारख्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे, हा मनसेसाठी एक मोठा धक्का आहे. कारण कल्याण-डोंबिवलीत मनसेचा विस्तार आणि जनाधार वाढवण्यात या दोन्ही नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. राज ठाकरे यांच्या विश्वासातील नेते म्हणूनही ते ओळखले जायचे.

आणखी वाचा- मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! डोंबिवली शहराध्यक्षासह पदाधिकारी शिवसेनेत

त्यांनी राजीनामे का दिले ? ते अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण कल्याण-डोंबिवलीत मनेसतंर्गत सर्वकाही आलबेल नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. राजेश कदम हे तर स्थापनेपासून मनसे सोबत होते. मंदार हळबे यांनी २०१९ मध्ये मनसेच्या तिकीटावर डोंबिवलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Setback to mns in kalyan dombivali mandar halbe join bjp dmp

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या