मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार! डोंबिवली शहराध्यक्षासह पदाधिकारी शिवसेनेत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची मनपा निवडणुकीच्या तोंडावर मोठी खेळी

संग्रहीत छायाचित्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या डोंबिवलीमध्येच मनसेला मोठे खिंडार पडले आहे. कारण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवलीचे शहाराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत विद्यार्थी सेनेपासून कार्यरत राहिलेले राजेश कदम हे शिवसेनेत गेल्याने, हा मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेश कदम यांच्यासोबत अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणझे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण या मतदारसंघातील हे सर्व पदाधिकारी असल्याचे समजत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला बालेकिल्ल्यातच खिंडार पाडल्याने, आता यावर मनसेकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये मनविसेचे सागर जेधे, डोंबिवली शहर संघटक दीपक भोसले, प्रदेश उपाध्यक्ष राहुल गणपुले, शहर सचिव कौस्तुभ फकडे, मनविसे शहर संघटक सचिन कस्तुर आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns state vice president and dombivali city president rajesh kadam joins shiv sena msr

ताज्या बातम्या