भिवंडी येथे एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. भोईवाडा पोलिसांनी अवघ्या दहा तासांत आरोपीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरतकुमार धनीराम कोरी (३०) असे आरोपीचे नाव असून, तो हमालीचे काम करतो. पीडित मुलीचे आई-वडील खानावळ चालवतात. शनिवारी रात्री पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानकपणे बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला, मात्र ती सापडली नाही.

रविवारी सकाळी गावातील एका व्यक्तीला तिचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या मोकळ्या जागेतील झुडपांमध्ये आढळला. त्याने दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहचले. मुंबईतील जे.जे रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडय़ाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी अवघ्या दहा तासांत आरोपीला अटक केली.

दहा तासांत आरोपीला अटक

पीडितेची आई-वडील खानवळ चालवतात. तेथे आरोपी भरतकुमार जेवणासाठी यायचा. शुक्रवारपासून त्याने खानवळीतील जेवण बंद केले. तपासादरम्यान ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतकुमारची चौकशी करण्यासाठी त्याच्या घरी गेले, मात्र तो त्या आधीच पसार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला भिवंडीतील वऱ्हाळदेवी तलाव परिसरातून अटक केली. त्याने गुन्ह्य़ाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven year old girl stabbed to death in bhiwandi abn
First published on: 23-12-2019 at 01:18 IST