ठाणे : महापालिका क्षेत्रात योग्यप्रकारे नालेसफाई करण्याबरोबरच सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे सज्जता आणि नालेसफाईचे दावे फोल ठरवले. शहरातील अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी साचले होते. पालिका मुख्यालय परिसरातील नालाही तुंबला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे गेले तीन महिन्यांपासून सातत्याने शहराचा दौरा करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पावसाळय़ापूर्वीची तसेच इतर कामांवर लक्ष केंद्रित करत ती पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केला होता. स्वच्छता, सुशोभीकरण, नाल्याच्या प्रवाहात अडथळे ठरणारी नागमोडी वळणे सरळ करणे, उद्यान, शाळा दुरुस्ती, तलावांचे थीमवर सुशोभीकरण करणे, पाणी तुंबणाऱ्या सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच २१ ठिकाणी पंप बसविणे अशी कामे करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. याशिवाय, सिडको भागात रेल्वे पुलाखाली खाडी भरतीच्या वेळेत पाणी साचू नये यासाठीही बटरफ्लाय वॉल बसविण्याची उपाययोजना करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, गुरुवारी तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालिकेचे दावे फोल ठरले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Several areas in thane under water due to heavy rain zws
First published on: 01-07-2022 at 00:02 IST