वांगणी येथील एका तरुणाने १५ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बदलापूर येथील कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विवेक पावसकर असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली.
पोलीसांच्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या मुलीसोबत विवेकशी मैत्री होती. त्यातून त्यांच्या नियमित भेटीगाठी होत असत. विवेक याने ११ जानेवारीला आपला वाढदिवस असल्याचे सांगून या मुलीला कुडसावरे येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पुन्हा याच ठिकाणी आणि फेब्रुवारी महिन्यात राहत्या घरी येऊन या मुलीचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत आई-वडिलांना सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अखेर कंटाळून या पीडित मुलीने तिच्या कुटुंबीयांना आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर कुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विवेक पावसकर याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर बलात्कार व जिवे मारण्याची धमकी देणे देण्यावरून गुन्हा दाखल झाल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual exploitation on promise of marriage
First published on: 26-03-2015 at 12:01 IST