नौपाडय़ातील दुकानांमध्ये आज उपस्थिती

ठाणे : पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल उत्साहात सुरू आहे. शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने सहभागी झालेल्या दुकानात ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. या खरेदी महोत्सवाच्या निमित्ताने आज, गुरुवारी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोमल मोरे या उपस्थित असणार आहेत. महोत्सवात सहभागी झालेल्या नौपाडय़ातील पितांबरी, कलानिधी, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि स्टेशन रोडवरील गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस या दुकानांना भेट देणार आहे.

खरेदीसोबत विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सातव्या पर्वाची रंगत वाढत असून या महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात विविध सांस्कतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने विविध सिने कलाकांराना भेटण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील सत्यव्वा हे पात्र साकरणारी अभिनेत्री कोमल मोरे या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांना ती भेट देणार असून त्या वेळी त्यांना भेटण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

रविवार, १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येत असून एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअरकंडिशनर, रेफ्रिजरेटर अशा भेटवस्तूसह गिफ्ट व्हाउचर आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीज् अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या भाग्यवान विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रायोजक

पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा रिजन्सी ग्रुप आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. तन्वी, ऑर्बिट, टिप टॉप मिठाईवाला, मे. पांडुरंग हरी वैद्य आणि कंपनी ज्वेलर्स हे या महोत्सवाचे असोसिएट पार्टनर आहेत. तर बंधन टुरिझम हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. रतांशी खेराज सारीज, जीन्स जंक्शन, द रेमंड शॉप, शुभकन्या, अशोक स्वीट्स, दैनिक मालवणी, अनंत हलवाई, मॅपल्स सलून आणि स्पा हे या महोत्सवाचे पॉवर्ड बाय प्रायोजक असून डिजी ठाणे हे महोत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तर या महोत्सवाचे खवय्ये रेस्टॉरन्ट हे फूड पार्टनर, पंरपंरा हे स्टायलिंग पार्टनर, वोरटेक्स हे वायफाय पार्टनर, डय़ुरेन फर्निचर हे कम्र्फट पार्टनर, गोल्डन अ‍ॅप्लायन्सेस हे होम अ‍ॅप्लायन्सेस पार्टनर, रिट्झ बँक्वेट्स हे बँक्वेट पार्टनर आणि सरलाज् हे ब्युटी पार्टनर आहेत. तर कलानिधी हे या महोत्सवाचे गिफ्ट पार्टनर आहेत.

कसे सहभागी व्हाल?

 

* पितांबरी रुचियाना प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बक्षिसांची संधी मिळू शकेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देयक दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

* ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’     आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

* या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.