ठाणे – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ठाण्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच एका दिव्यांग मुलाने शिंदे यांच्याकडे कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी तक्रार केली. आम्हाला ताटकळत ठेवण्यात आले. जेवण वेळेत मिळाले नाही असे त्या मुलाने सांगितले. त्यांनतर शिंदे यांनी त्या मुलाची समजूत काढली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र संचालित स्वयम पुनर्वसन केंद्र यांच्या वतीने रविवारी दिव्यांगांसाठी मोफत उपकरणांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध भागांतून हजारो दिव्यांग आले होते. दुपारी मुख्यमंत्री या कार्यक्रमास आले असता एक दिव्यांग मुलगा त्यांच्या जवळ आला आणि त्याने कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी थेट शिंदे यांच्याकडेच तक्रार केली.

हेही वाचा – कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खा – डॉ. जगन्नाथ दीक्षित; वजन आणि मधुमेह कमी करण्याचा मार्ग

हेही वाचा – मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात चारजण जखमी

आम्हाला खूप वेळ ताटकळत ठेवले गेले. जेवण वेळेत मिळाले नाही असे त्या मुलाने मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले. त्यांनतर शिंदे यांनी त्या मुलाची समजूत काढली. या प्रकाराविषयी स्वयम संस्थेला विचारले असता, आपण सर्वांना खाद्य पदार्थांचे वाटप केल्याचा दावा केला. तसेच जिल्ह्याच्या बाहेरूनदेखील अनेक जण आले होते. त्यामुळे गर्दी झाली होती असेही त्यांनी सांगितले.