ठाण्यात २ डिसेंबर, तर कल्याणमध्ये ८ डिसेंबपर्यंत प्राथमिक फेरी
राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची रंगत सध्या ठाणे आणि कल्याण शहरात पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले असून स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरी तर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कल्याण केंद्राच्या प्राथमिक फेरीचा आनंद शहरवासीयांना घेता येणार आहे. ठाणे केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात मंगळवारी ‘आला रे राजा’ या नाटकाने तर कल्याण केंद्रावरील प्राथमिक फेरीची सुरुवात ‘तू काय..मी काय’ या नाटकाने झाली. या स्पर्धेचा आनंद रसिकांना अवघ्या दहा, पंधरा रुपयांत घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State drama competition in thane
First published on: 18-11-2015 at 02:03 IST