सागर नरेकर

अंबरनाथ :  अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) राबविला जाणारा राज्यातला पहिला अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प या तीन शहरांसाठी लवकरच कार्यान्वित होणार आहे. या कामासाठी लघुत्तम निविदा नुकतीच स्वीकारण्यात आली आहे.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांसाठी स्वत:ची कचराभूमी नाही. हा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादातही पोहोचला होता. लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही कचराभूमीचा प्रश्न सुटला नव्हता. मात्र, आता बदलापूर पालिकेच्या कचराभूमीवर या दोन्ही महापालिकांनाही जागा मिळाली आहे. या ठिकाणी नियोजित असलेल्या अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाचे ‘कंत्राट आर अ‍ॅण्ड बी प्रोजेक्ट्स लिमिटेड’ कंपनीला देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>VIDEO : “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध, मी कधीही…”, एकनाथ शिंदेंची ग्वाही

बदलापूर शहराची निवड का?

अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिकांकडे कचराभूमीसाठी स्वतंत्र जागा नाही. बदलापूर शहराची कचराभूमी शहरापासून दूर, दगडखाणीजवळ आणि मोठी असल्याने येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले. बदलापूर पालिकेच्या २४ एकरांपैकी १३ एकर जागा ही प्रकल्प उभारण्यासाठी वापरली जाणार आहे. एकूण १४८ कोटी ६८ लाखांच्या खर्चापैकी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका एकूण १९.८२ कोटी रुपयांची मदत करणार आहे. तर, सुमारे १२८ कोटी ८८ लाख रुपये एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळणार आहेत.

पुनर्वापरासाठी प्रयत्न..

या घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून त्याचा पुनर्वापर करण्याचेही नियोजन आहे. या ठिकाणी ६४१ टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यातील सर्वाधिक ३४० टन कचरा उल्हासनगर महापालिकेचा तर, अंबरनाथ आणि बदलापूरचा अनुक्रमे २०३ आणि ९७ टन कचरा असेल.