scorecardresearch

Premium

डोंबिवलीत कारच्या धडकेत विद्यार्थीनी गंभीर जखमी

शिळफाटा रस्त्यावरील नेकणी पाडा भागातील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले.

Students injured in car collision in Dombivli
याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील शिळफाटा रस्त्यावरील नेकणी पाडा भागातील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या १५ वर्षाच्या विद्यार्थीनीला भरधाव कारने धडक देऊन गंभीर जखमी केले. मंगळवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर कार चालक तेथून पळून गेला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Rat tail in student food akola
अकोला : विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात उंदराचे शेपूट! दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
Accused who assaulted student in Dombivli not arrested yet complaint to Thane Police Commissioner
डोंबिवलीत विद्यार्थ्याला मारहाण करणारे आरोपी मोकाट, ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार
thane, Electric Lighting, Trees, Legal Notice, TMC, BMC, State Environment Department,
ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईमुळे महापालिका आणि पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस

दावडी भागातील एका गृह संकुलात भगवान ठोंबरे हे कुटूंबासमवेत राहतात. त्यांची मुलगी तेजल (१५) ही परिसरातील एका खासगी शिकवणी वर्गात दररोज सात वाजता जाते. मंगळवारी सकाळी ती नेकणी पाडा भागातील रिजन्सी ते कावेरी चौक येथून शिकवणीसाठी पायी जात होती. नेकणी पाडा भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने धडक दिली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आणखी वाचा-भाजप आमदार गायकवाड यांची मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्याकडून पाठराखण

वाहन थांबून जखमी मुलीला मदत करण्याऐवजी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पादचाऱ्यांनी या मुलीच्या कुटुंबीयांना संपर्क केला. तिला तातडीने रूग्णालयात नेले. तिचे वडील भगवान ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी कार चालकाचा शोध घेण्याची मागणी ठोंबरे कुटुंबीयांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students injured in car collision in dombivli mrj

First published on: 06-12-2023 at 16:08 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×