स्नेहा जाधव-काकडे

ठाणे : जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, शहराच्या काही भागांत बालविवाह सुरूच असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे, कल्याण तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. करोनाकाळात आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक मुलींना पालकांच्या दबावापोटी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काही मुलींचे करोनाकाळात त्यांच्या पालकांनी विवाहही पार पाडले. त्यांना पुढे शिकण्याची इच्छा असूनही कुटुंबीयांनी त्यांना परवानगी दिली नाही.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
drowned
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू

१ मार्च २०२० ते १ मार्च २०२३ या कालावधीत १८ बालविवाह रोखण्यात आले आहेत. करोनाकाळात अनेक निर्बंध राज्य सरकारने आणले होते. या वर्षी मागील तीन महिन्यांत एक बालविवाह रोखला गेला. तर या वर्षांच्या तुलनेत २०२२ या वर्षी पाच बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. बाल संरक्षण कक्ष, स्थानिक पोलीस, सामाजिक संस्था, महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून हे विवाह रोखण्यात यश आले आहे. 

प्राप्त माहितीच्या आधारे झालेल्या कारवाईत मार्च २०२२ ते मार्च २०२३ या वर्षांत १ बालविवाह रोखण्यात आले. यापूर्वी २०२२ मध्ये ५ बालविवाह रोखले गेले होते. तर २०२१ मध्ये सर्वाधिक आठ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकीकडे समाजात जनजागृती वाढत असताना नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने कारवाईत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सधन तालुक्यांत बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे. ठाणे आणि कल्याण तालुक्यात प्रत्येकी पाच तक्रारी नोंदविल्या गेल्या. त्यापाठोपाठ उल्हासनगर ३, शहापूर आणि भिवंडीत प्रत्येकी दोन, तर सर्वात कमी तक्रारी म्हणजेच एक तक्रार मुरबाड तालुक्यातून नोंदविण्यात आल्या. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी दिसून येते. करोनाकाळामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे मुलींचे लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र त्याच वेळी अवैधरीत्या होणारे हे विवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे यासाठी मदत कक्ष, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरीत्या काम केल्याने २०२१ या वर्षी आठ बालविवाह रोखण्यात यम्श मिळाले आहे.