डोंबिवली : येथील सर्वेश सभागृहाच्या संचालिका सुनिता फाटक यांचे गुरूवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ वास्तुविशारद जयंत फाटक, मुलगी लीना गद्रे, जावई राजन गद्रे असा परिवार आहे.

मागील काही महिन्यांपासून त्या आजारामुळे बिछान्याला खिळून होत्या. १९८८ पासून सुनिता फाटक सर्वेश सभागृहाचा कारभार पाहत होत्या. मनमिळावू, मदतीसाठी नेहमीच हात पुढे करणाऱ्या सुनिता फाटक सीता वल्लभ सामाजिक संस्था चालवित होत्या. या संस्थेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षात गोरगरीब, गरजुंना आर्थिक मदत केली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून साहाय्य केले.