७८२ प्रतिबंधित क्षेत्रांतील तीन लाख ७० नागरिकांची तपासणी ठाणे : जिल्ह्यच्या ग्रामीण भागात आजवर एक हजार १२७ प्रतिबंधित क्षेत्रांतील ७८२ भागांतील तीन लाख ७० हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ३४५ प्रतिबंधित क्षेत्रांचे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागांतील करोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले असले तरी रोज आढळणाऱ्या १०० हून अधिक करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर कायम आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांचा समावेश ठाणे ग्रामीणमध्ये होतो. करोनाकाळात सुरुवातीला रोज दहाहून कमी रुग्ण आढळत होते. मात्र, काही दिवसांपासून १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या भागातील एकूण बाधितांची संख्या ७ हजार ६८२ वर झाली आहे. त्यामुळे रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणांना १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. आजवर जिल्ह्यतील रुग्ण आढळणाऱ्या एक हजार १२७ ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांपैकी ७८२ प्रतिबंधित क्षेत्रांचे १४ दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या भागातील ८७ हजार १५२ घरांमध्ये राहणाऱ्या तीन लाख ७० हजार ७७३ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तर उर्वरित ३४५ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या ८६२ पथकांमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजवर सात हजार ६८२ रुग्णांपैकी ६ हजार १७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या १ हजार २७६ रुग्ण उपचाराधीन आहेत. सध्या या भागांत १०० हून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत, तर रोज मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही सहाहून अधिक आहे. या शहरांमध्ये सर्वेक्षण तालुका एकूण सर्वेक्षण पूर्ण सर्वेक्षण सुरू प्रतिबंधित क्षेत्रे झालेली क्षेत्रे असलेली क्षेत्रे अंबरनाथ १२७ ९३ ३४ कल्याण ३४४ २६१ ८३ भिवंडी ३९८ २८१ ११७ शहापूर १५२ ८५ ६२ मुरबाड १०६ ६२ ४४ या शहरांतील करोनाची स्थिती तालुका एकूण रुग्ण करोनामुक्त सक्रिय रुग्ण मृत्यू अंबरनाथ ९८७ ७६६ १९९ २२ कल्याण २०२१ १६२७ ३४६ ४८ भिवंडी ३२८६ २८०७ ३६८ १११ शहापूर १००५ ७२७ २४३ ३५ मुरबाड ३८३ २५२ १२० ११