ठाण्यातील ‘स्वाद थाळी’तर्फे आपल्या कर्तृत्त्वाने विविध क्षेत्रात स्वत:ला सिध्द करणाऱ्या कर्तृत्त्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
गेली तीन वर्षे स्वाद परिवारातर्फे हा उपक्रम राबविला जातो. यंदा चौथ्या वर्षी धनश्री गृह उद्योग व्यवसायाच्या भारती वैद्य यांना उद्योजिका पुरस्कार, अंधांसाठी काम करणाऱ्या शुभांगी घाग यांना स्वयंसिध्द पुरस्कार, नोकरी संपल्यावर पॅराफ्लेजीक मुलांसाठी संजीवन दीप या सेवाभावी संस्थेची स्थापना करुन अपंगांसाठी काम करणाऱ्या सुलभा वर्दे यांना सामाजिक कार्य पुरस्कार तसेच श्रीकृष्ण म्हसकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या सत्कार समारंभात गौरव करण्यात आला.
स्वाद थाळीचे बळवंतराव कर्वे यांनी आपली काकू, आई वडील व पत्नी कुटुंबासाठी दिलेले योगदान, जपलेले सामाजिक भान याचे ऋण फेडण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले.