मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. रोज लाखो प्रवासी या लोकल सेवेने प्रवास करत असतात. ऑफिस किंवा घर गाठत असतात. आता ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे मार्गावर आता बिघाड झाला आहे. मध्ये रेल्वेच्या कर्जतला जाणाऱ्या लोकल मार्गावर अंबरनाथ-बदलापूरच्या दरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कर्जतला जाणाऱ्या लोकल्स या तूर्तास अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येत होत्या, पण आता ही सेवा पूर्ववत झाली आहे.
मध्य रेल्वेचे डीआरएम यांनी काय पोस्ट केली आहे?
मध्य रेल्वेच्या डीआरएमनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ बदलापूर लोकल मार्गावर एका मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. मध्य रेल्वेचे कर्मचारी सदर मार्गावर हा बिघाड थांबवण्यासाठी काम करत आहेत. मात्र तोपर्यंत कर्जतला जाणाऱ्या सर्व लोकलची सेवा अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या तसदीबाबत आम्ही दिलगीर आहोत अशी पोस्ट करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या सेवेचा अनेकदा खोळंबा होत असतो. कधी कल्याण ते सीएसएमटी मार्गावर, कधी कसारा मार्गावर. तसा आता कर्जत मार्गावर झाला आहे. त्यामुळे कर्जतला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. लोकल ट्रेनवर अनेक प्रवासी अवलंबून असतात. कर्जत गाठणाऱ्या प्रवाशांना आता अंबरनाथहून काही पर्याय निवडावे लागतील किंवा मग लोकल सेवा सुरळीत होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. मध्य रेल्वे आणि त्यावर धावणारी लोकल यांच्या समस्यांना प्रवासीही वैतागले आहेत. त्यात आता आज कर्जत मार्गावर मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा अंबरनाथपर्यंतच चालवली जाते आहे.