बदलापूरः मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील विस्तारीत भागासाठी आवश्यक असलेल्या पुरक पाणी योजनेला गती मिळणार आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नुकतीच निविदा मागवण्यात आल्या असून २३ कोटी २२ लाखांच्या या खर्चातून ही योजना राबवली जाणार आहे. नवे जलकुंभ, नव्या जलवाहिन्या यांच्या माध्यमातून विस्तारीत भागात पाणी पोहोचवण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे.

मुरबाड शहराची लोकसंख्या दिवसेदिवस वाढते आहे. या मुरबाड नगर पंचायत क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी पुरक पाणी पुरवठा योजना राबण्यात येते आहे. या योजनेच्या माध्यमातून अस्तित्वात असलेल्या पाणी वितरण व्यवस्थेला आणखी बळकट करण्याचे काम केले जाणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुरबाड नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने निविदा मागवण्यात आल्या आहेत. २३ कोटी २२ लाख रूपये खर्चातून या दुसऱ्या टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. या दुसऱ्या टप्प्यात ५.३२ किलोमीटर लांबीच्या नव्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. यातील काही ठिकाणी जुन्या जलवाहिन्या आहेत. तर काही ठिकाणी नव्याने जलवाहिन्या टाकल्या जातील. जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह, शास्त्री नगर, म्हसा रस्ता आणि बाजार समिती परिसरात नव्या जलवाहिन्या आणि नव्या जलकुंभांची कामे केली जाणार आहेत. शिरवली धरणातून येणाऱ्या पाण्यावर ही योजना कार्यान्वित होते आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या १८ महिन्यात या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>ठाण्यात शरद पवार गटाने राष्ट्रपतींना पाठविली दहा हजार पोस्टकार्ड; मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी

या दुसऱ्या टप्प्यामुळे मुरबाड शहरातील पाणी वितरण व्यवस्था मजबूत होणार आहे. नव्या जलकुंभ आणि जलवाहिन्यांच्या माध्यमातून वितरण व्यवस्थेतील दोष दूर करण्याचा प्रयत्न आहे. विस्तारीत भागाला या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. मुरबाड शहराची वाढती लोकसंख्या पाहता ही योजना शहरासाठी फायदेशीर ठरणार आहे.

Story img Loader