scorecardresearch

Premium

ठाण्यात धावत्या कारनं अचानक पेट घेतला, ७ जण थोडक्यात बचावले!

ठाण्यात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतूक संथ झाली होती. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

thane burning car
ठाण्यात धावत्या कारने अचानक पेट घेतला! (फोटो – एएनआय)

रस्त्यांवर अपघाताच्या घटनांप्रमाणेच आता धावत्या गाड्यांना अचानक आग लागण्याच्या घटनाही वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कार अचानक पेटल्यामुळे झालेल्या दुर्घटनाही चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अशीच एक घटना ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर घडली असून यात सात जणांचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं ठाणे महानगर पालिकेच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशीरा ही कार पनवेलहून मुंब्रा बायपासमार्गे ठाण्याच्या दिशेने जात होती. मुंब्रा बायपासवर या कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारमध्ये सात प्रवासी होते. यात चालकाव्यतिरिक्त एक पुरुष, दोन महिला व तीन मुलांचा समावेश होता. कारनं पेट घेतल्याचं लक्षात येताच कारमधील प्रवासी तातडीने उतरले. अवघ्या काही क्षणांत कार पूर्णपणे पेटल्याचं दिसून आलं.

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
security guard died after bricks fell
मुंबई : डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Gondia, Tragic Accident, Car Veers, Canal, Three Killed, Pangaon, Salekasa,
गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
malegaon, stolen bikes seized, seven people detained
मालेगावातून चोरीच्या १३ दुचाकी हस्तगत, सात जण ताब्यात

या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात यश मिळवलं. ही आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

कारमध्ये आग लागण्याची संभाव्य कारणे…

दरम्यान, अशा प्रकारे धावत्या कारमध्ये आग लागण्याची काही संभाव्य कारणं मोटर मेकॅनिकल तज्ज्ञांकडून सांगितली जातात. मोटारीत पार्टस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायबर प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे आग पसरण्यास मदत होते. बोनेटच्या भागातील इंजिन, बॅटरी आणि इलेक्ट्रिक कनेक्शन, सीएनजी किटमध्ये लिकेज असेल किंवा अनधिकृतरीत्या बसवलेली असेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. दरम्यान, अशा वेळी घाबरून न जाता वाळू किंवा माती टाकून मोटारीला लागलेली किरकोळ आग विझवता येते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane burning car incident moving vehicle caught fire on mumbra bypass pmw

First published on: 04-09-2023 at 09:34 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×