ठाण्यातील ढोकाळी परिसरातील कोलशेत रोडवरील नंदीबाबा मंदिर येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मंदिराच्या जाळीतून मंदिरातील दोन मूर्ती चोरून नेल्या. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास हा तरुण मंदिराची साफसफाई करून झोपी गेला. त्या वेळी चोरटय़ांनी पंचधातूची गणेशमूर्ती आणि पितळेची दुर्गा देवीची मूर्ती अशा सुमारे ६९ हजारांच्या दोन मूर्ती चोरटय़ांनी पळवल्या.
या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ठाणे, डोंबिवलीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
ठाणे : ठाणे आणि डोंबिवली शहरामध्ये शनिवारी दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. ठाण्यात एका शिक्षिकेच्या गळ्यातील सुमारे ७० हजारांचे दागिने चोरटय़ांनी पळवले. तर डोंबिवलीतील कुटुंबासह आइस्क्रीम खाण्यासाठी चालल्या असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांचा हार लंपास केला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाणे आणि डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुनाच्या आरोपातून दोघांची मुक्तता
ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात संघटित गुन्हेगारी टोळी चालवीत असल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी सहा वर्षांपूर्वी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या दोघांची ठाणे न्यायालयाने शनिवारी निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच भिवंडीतील एका व्यापाऱ्याचा खून केल्याच्या आरोपातूनही दोघांची मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिसांना या प्रकरणात ठोस पुरावे न्यायालयापुढे सादर करण्यात अपयश आल्याचे उघड झाले आहे.
राजू रामबली गौड ऊर्फ सैतान ऊर्फ छबीराज (३२) आणि बब्बू ऊर्फ मोइनद्दीन मुस्तफा अन्सारी (३०) अशी निर्दोष मुक्तता झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचा प्रमुख साथीदार रावण ऊर्फ बबलू रामबली गौड (३०) याचा कारागृहात बंदिस्त असताना आजारपणामुळे मृत्यू झाला.