ठाणे – मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज कायम आहे. सोमवार दुपारनंतर आणि मंगळवारी शहरात रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवार, मंगळवार प्रमाणेच बुधवारी देखील शहरात पावसाची संततधार होती. या पावसामुळे अनेक परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक वस्तीत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, आपत्तीग्रस्तांना सुरक्षित निवारा मिळावा या उद्देशाने ठाण्यातील नौपाडा परिसरातील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत नागरिकांना तात्पुरता निवारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाच्या निर्णयाने पालकांना आणि नजिकच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

सरस्वती मंदिर ट्रस्ट ही नोंदणीकृत शैक्षणिक संस्था आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेचा मराठी प्राथमिक विभाग १९५२ साली सुरु करण्यात आली. तसेच माध्यमिक विभाग १९६२ साली सुरु झाला. प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग मान्यताप्राप्त आहेत. संस्थेने शाळेची जुनी इमारत २०१८ साली पाडून तिथे नवीन इमारत उभारण्यात आली. या शाळेत मराठी प्राथमिक विभागात इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या ५४७ आहे. तर, माध्यमिक विभागाची पाचवी ते दहावीची विद्यार्थी संख्या ९७२ आहे. इंग्रजी माध्यमात इयत्ता पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी ८२५ एवढे आहेत. याशिवाय मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे २५६ व २८३ अशी आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकातील अभ्यासक्रमाप्रमाणेच व्यवहार ज्ञान यावे यासाठी आर्थिक नियोजन शिकवले जातात. तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी भाज्या, रंग ओळख, आकार ओळख यासाठी साक्षरतेची जत्रा उपक्रम राबवला जातो. त्याचप्रमाणे शेतीच्या कामांचे ज्ञान मिळावे यासाठी देखील पेरणी ते कापणी हा उपक्रम राबवण्यात येतो. अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सरस्वती शाळा काम करत असते. अशातच सामाजिक भान जपत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसात अनेकांच्या घरात पाणी शिरले. अशा नागरिकांना आपत्तीग्रस्तांना सुरक्षित निवारा मिळावा या उद्देशाने ठाण्यातील नौपाडा परिसरातील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेच नागरिकांना तात्पुरता निवारा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरस्वती मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनाच्या निर्णयाने पालकांना आणि नजिकच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

मागील दोन दिवस पावसाचा अंदाज घेऊन शाळा, महाविद्यालयांना शिक्षण विभागाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थी घरी अडकून पडली आहेत. अभ्यास किंवा खेळण्यासाठी हे विद्यार्थी शाळेत येऊ शकतात असा देखिल निर्णय शाळा व्यवस्थापनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस आहे. अशातच विद्यार्थी घरातच अडकून आहेत. अशा विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शाळेत यायचे असल्यास ते शाळेत येऊ शकतात. त्याच बरोबर पालक आणि इतर नागरिकांनाही निवारा दिला जाणार आहे. – सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट