ठाण्यात कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटनी घडली आहे. एव्हरेस्ट सोसोयटीतील ग्लोरी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून या तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिष्ठा सोम (वय २७) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. सुष्मिता ही ठाणे- मुंबईतील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली शर्मिष्ठाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून याप्रकरणी कापूरबावडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane doctors daughter committed suicide
First published on: 05-01-2019 at 12:53 IST