ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधरण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी ती संधी गमावली आहे. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानला त्याचे चोख उत्तर मिळालेले आहे. जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामो-निशान मिटविण्याची हिंमत भारतात आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. पाकिस्ताने शस्त्र संधीचे उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधरण्याची संधी दिली होती. परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहे. त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. भारतीय लष्कर मजबूत आहे. त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे, असे शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतासोबत लढणे सोपे नाही हे पाकिस्तानला माहित नाही. भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहिती आहे. बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील. पाकिस्तानने त्यांच्या कुवती प्रमाणे वागले पाहिजे, अशी टीका शिंदे यांनी केली.