सुबियाच्या जबाबातून धक्कादायक माहिती उघड; कृत्याचे कारण अस्पष्ट

कासारवडवली गावातील हत्याकांडामध्ये बचावलेली सुबिया भरमल हिने शुक्रवारी रात्री ठाणे पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबामधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हसनैन हा गतिमंद असलेल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याची बाब आईसह तिघी बहिणींपर्यंत पोहोचलेली होती आणि यावरून आमच्यामध्ये चर्चाही झाल्याचे हसनैनला समजले होते, असे सुबियाने जबाबामध्ये म्हटले आहे. तसेच त्याच्यावर सुमारे ६८ लाखांचे कर्ज असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. यामुळे या दोन्हींपैकी एका कारणावरून त्याने हे हत्याकांड घडविल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोलीस येऊन पोहोचले आहेत. मात्र, त्यापैकी नेमके कोणते कारण हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून त्यासंबंधीचा सविस्तर तपास सुरू आहे, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिली.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या

कासारवडवली गावात हसनैन वरेकर या तरुणाने घरातील चौदा जणांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली. या हत्याकांडामध्ये हसनैन याने सुबिया भरमल या बहिणीवरही जीवघेणा हल्ला केला होता, मात्र या हल्ल्यातून ती सुदैवाने बचावली होती. या प्रकरणी सुबियाच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे घटनाक्रमाव्यतिरिक्त तिच्याकडून अधिक माहिती मिळू शकलेली नव्हती. अखेर शुक्रवारी रात्री तिने पोलिसांकडे जबाब नोंदविला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गतिमंद असलेल्या बतुल या बहिणीवर हसनैन हा लैंगिक अत्याचार करीत असल्याची बाब जानेवारी महिन्यात घरी गेले त्या वेळी समजली होती. असे सुबियाने जबाबात म्हटले आहे. या प्रकरणाची माहिती इतरांपर्यंत जाईल आणि समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी त्याने हे हत्याकांड केले असावे. तसेच त्याच्या डोक्यावर सुमारे ६८ लाखांचे कर्ज असल्याने त्यातूनही त्याने हत्याकांड केल्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्हींपैकी नेमक्या कोणत्या कारणावरून त्याने हत्याकांड केले, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डुम्बरे यांनी दिली.  तो गमतीने कुर्बानीचा सुरा बहिणीच्या गळ्यावर लावायचा आणि एक किंवा दोन कटमध्ये गळा कापेल, असे सांगायचा. चार वर्षांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता, असेही डुम्बरे यांनी सांगितले.

सुबियाचा जबाब..

  • त्या दिवशी दावत रात्री एक वाजेपर्यंत सुरू होती आणि जेवणानंतर लगेचच सगळ्यांना झोप आली. काही वेळानंतर जाग आली तेव्हा आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला.
  • घरामध्ये पाहणी केली असता, हसनैन हा बतुल आणि आईला मारत होता. ‘मुझे तो छोड दे, मैंने तुझे जन्म दिया है अशी विनवणी आई त्याच्याकडे करीत होती. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘सबको मारूंगा और खुद भी मरूंगा’ असे तो सांगत होता.
  • त्याच वेळी त्याचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्याने हल्ला केल्याने मी खाली पडले. त्यानंतर त्याने आई आणि बतुलची हत्या केली. यानंतर तो पुन्हा माझ्याजवळ आला आणि केस पकडून मला उभे केले. ‘तुझे माँ से बहुत प्यार है ना’ असे बोलू लागला. त्याच वेळी अरसिया जिवंत असल्याचे सांगून मी त्याचे लक्ष विचलित केले.
  • त्यानंतर त्याला धक्का देऊन बाजूच्या खोलीत शिरले आणि त्याचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे हसनैन खिडकीतून धमकावीत होता. बाहेर आलीस नाही तर तुझ्या मुलीला मारू न टाकेन, अशी धमकी देत होता, परंतु आवाजामुळे आसपासचे लोक जमा होतील, या भीतीने तो पुन्हा घरात आला आणि त्याने आत्महत्या केली.