डोंबिवली – येथील एमआयडीसी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत.पोलिसांनी सांगितले, एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय परिसरात आर्किनिया इमारत आहे. या इमारतीत आर्चिस स्पा नावाचे मसाज पार्लर आहे.

हेही वाचा >>> माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याठिकाणी तरूणींना आणून देह व्यापार केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्लरवर काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. व्यापार संकुलाचे या भागात मोठे हब आहे. त्यामुळे तरूण, तरूणींचा या भागात सतत वर्दळ असते. अनेक तरूणी या मसाज पार्लरमध्ये देह व्यापार करत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी शुक्रवारी या पार्लरवर छापा टाकला. या पार्लरमधील पाच तरूणींची सुटका केली. या घटनेच्यावेळी तेथे उपस्थित असलेला व्यवस्थापक भुवड याला पोलिसांनी अटक केली. या पार्लरचा चालक वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता. आतापर्यंत किती तरूणींना या पार्लरमध्ये आणले गेले. या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.