राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कळवा येथील माजी नगरसेवक तसेच आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय असलेले महेश साळवी यांना ठाणे पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यांच्याविरोधात मारहाण आणि राजकीय गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत महेश साळवी यांच्याकडून ठाणे पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महेश साळवी हे कळवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. डिसेंबर २०२३ मध्ये महेश साळवी यांना ठाणे पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. मंगळवारी साळवी यांनी ही नोटीस स्विकारली आहे. साळवी यांच्याविरोधात मारहाणीचे आणि राजकीय गुन्हे दाखल आहे. तडीपार का केले जाऊ नये असे ठाणे पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडून नोटीसला उत्तर अपेक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महेश साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh salvi zws
First published on: 04-04-2024 at 13:19 IST