तीन हात नाका येथून मॉडेला चेकनाकाच्या दिशेकडील मार्गिकेच्या इटर्निटी मॉल ते रहेजा गार्डन या भागाच्या दुरूस्तीचे काम ठाणे महापालिकेने हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ज्ञानसाधना महाविद्यालय, परबवाडी, मनोरूग्णालय येथून वळविण्यात आली आहे. शुक्रवारपासून (आज) ते ३१ मे पर्यंत म्हणजेच, दीड महिने हे वाहतूक बदल लागू राहणार आहे. पर्यायी मार्ग हे अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन हात नाका येथून मॉडेला चेकनाकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना इटर्निटी मॉल समोरील मॅरेथॉन चौकात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या सेवा रस्त्याने इटर्निटी गृहसंकुल, टाटा मोटर्स, महावितरण कार्यालय, परबवाडी, शिवसेना शाखा, मनोरुग्णालय चौक, एस. बी. फिरके विद्यालय, रहेजा गार्डन येथून इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल शुक्रवारपासून ते ३१ मे पर्यंत लागू राहणार आहेत.