ठाण्याचे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी बहुमजली वाहनतळे, अंतर्गत मेट्रो रेल्वेचे स्थानक असे प्रकल्प महापालिका, रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविण्यात येणार असून या कामांसाठी तिन्ही विभागाकडून स्वतंत्र आराखड्याद्वारे कामे केली जाणार असल्याने हे प्रकल्प भविष्यात प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही यंत्रणांना एकत्रित आणून एकाच आराखड्याच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून त्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्याचा बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, शुक्रवार बंद

ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावर प्रवाशांचा भार वाढलेला असून तो कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुूंडदरम्यान नवीन स्थानक प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे ते कासारवडवलीदरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरु आहे. याशिवाय, ठाणेकरांना अंतर्गत सार्वजनिक वाहतूकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी अंतर्गत मेट्रो प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाचा आराखडा महामेट्रोने तयार केलेला आहे. नवीन स्थानक, घोडबंदर आणि ठाणे स्थानक अशी अंतर्गत मेट्रोची वर्तुळाकार मार्गिका असणार आहे. अंतर्गत मेट्रोची एकूण २२ स्थानके असणार असून त्यात ठाणे स्थानकाचाही समावेश आहे.

हेही वाचा- कल्याणमध्ये फुकट जाहिरात फलक लावणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे दाखल

ठाणे शहरातून रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार करून हे स्थानक प्रस्तावित करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाकडे हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाबरोबरच राज्य परिवहनच्या जागेवर आगार आणि बहुमजली वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव पालिकेने परिवहन प्रशासनाला दिला होता. या प्रस्तावाबाबत परिवहन प्रशासनाकडून सकात्मक प्रतिसाद मिळाल्याने पालिका आता त्यांना सविस्तर प्रकल्प आराखडा सादर करणार आहे. याशिवाय, स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर रेल्वे विभागाकडून वाहनतळाची उभारणी करण्यात येणार आहे. या तिन्ही प्रकल्पांमुळे ठाणेकरांना स्थानकाजवळच वाहनतळाची सुविधा मिळणार असून त्याचबरोबर अंतर्गत वाहतूकीसाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. परंतु महापालिका, रेल्वे आणि राज्य परिवहन महामंडळ या तिन्ही विभागाकडून स्वतंत्र आराखड्याद्वारे कामे केली जाणार असल्याने हे तिन्ही प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार नाहीत आणि त्यामुळे भविष्यात हे प्रकल्प प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरण्याची भिती व्यक्त होत आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली असून त्यात ते तिन्ही विभागांनी एकत्रित येऊन ही कामे करावीत, असा आग्रह धरत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा- ठाणे पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता

तर प्रकल्प गैरसोयीचे ठरतील

पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रस्तावित असलेल्या अंतर्गत मेट्रो, बहुमजली वाहनतळाचे मार्ग एकमेकांना जोडले गेले नाही तर, प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागू शकतो. हा प्र‌वास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळेच हे मार्ग एकमेकांना जोडण्यात यावेत असा आग्रह पालिकेने संबंधित विभागाकडे धरल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले पालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी बहुमजली वाहनतळे, अंतर्गत मेट्रो रेल्वेचे स्थानक असे प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पांचे मार्ग एकमेकांना जोडण्यात आले तर ते प्रवाशांसाठी फायदेशीर ठरू शकते. संबंधित विभागांनी स्वतंत्रपणे प्रकल्प राबविल्यास हे मार्ग जोडले जाणार नाहीत. त्यामुळेच सर्व विभागांना एकत्रित आणून एकाच आराखड्याच्या माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठीच संबंधित विभागांसोबत बैठका घेत आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल