सात बेटांची मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची प्रमुख आर्थिक केंद्र असली तरी तिच्या विस्तारीकरणाला मर्यादा होत्या. साहजिकच मुंबईचे विस्तारीकरण लगतच असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात होऊ लागले. सत्तरच्या दशकापासून ठाणे शहराची वाढ झपाटय़ाने होऊ लागली. ऐंशीच्या दशकात ठाणे नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. त्यानंतर पूर्व द्रूतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला येऊरचा डोंगर ते भाइंदर खाडीपर्यंत ठाणे शहर विस्तारू लागले. दर दहा वर्षांनी या शहराची लोकसंख्या दुप्पट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सोबतच्या छायाचित्रावरून ठाणे शहराची वाढ कशी झाली, हे दिसून येते. पहिले कृष्णधवल छायाचित्र साधारण साठ वर्षांपूर्वीचे आहे. त्याच जागेवरून दुसरे छायाचित्र आता घेण्यात आले. त्याद्वारे पूर्वी मोकळे माळरान असलेल्या ठिकाणी आता ठाणे महानगर नावाचे काँक्रीटचे जंगल उभे राहिलेले दिसते..
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2015 रोजी प्रकाशित
ठाणे.. काल, आज, उद्या : हिरवाई ते काँक्रिटचे जंगल
सात बेटांची मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची प्रमुख आर्थिक केंद्र असली तरी तिच्या विस्तारीकरणाला मर्यादा होत्या.

First published on: 24-02-2015 at 12:41 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane yesterday today tomorrow