ठाणे: मध्य रेल्वेच्या वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या पारसिक बोगद्याची स्थिती अत्यंत वाईट झाली असून या बोगद्याच्या परिसरात बेकायदा बांधकामे वाढू लागली आहे. बोगद्याच्या दोन्ही दिशेला कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बोगद्याच्या माथ्यावरून रिक्षा, टेम्पो, दुचाकींची वाहतुक होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका, वन विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बोगद्याला धोका निर्माण झाला आहे.

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेवर १०० वर्षाहून अधिक जुना पारसिक बोगदा आहे. ठाणे ते दिवा ही नवी मार्गिका सुरू होण्यापूर्वी जलद उपनगरीय, एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतुक या बोगद्यातून होत असे. काही महिन्यांपूर्वी नव्या मार्गिका तयार झाल्याने आता बोगद्यातून केवळ एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतुक होते. या बोगद्याच्या परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. तसेच येथील नागरिकांकडून रुळांच्या दिशेने फेकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे अपघाताची भितीही व्यक्त केली जात होती. याबाबत टिका होऊ लागल्यानंतर ठाणे महापालिका, रेल्वे प्रशासन आणि वन विभागाकडून परिसराचे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर या तिन्ही प्राधिकरणाने बोगद्याच्या संरक्षणासाठी बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याचे ठरविले होते. वन विभाग आणि ठाणे महापालिकेने काही दिवस या भागात कारवाई केली होती. तसेच कचरा हटवून बोगद्याच्या माथ्यावर रोपांची लागवड केली होती. परंतु आता या बोगद्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production
साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका

हेही वाचा.. सातवाहन राजाचे वंशज असल्याचे दाखवून कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्याची जागा हडप करण्याचा डाव

गेल्याकाही दिवसांपासून या भागात बेकायदा बैठ्या चाळी उभारणीची कामे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर याठिकाणी पुन्हा कचरा फेकण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य बोगद्याच्या दोन्ही बाजूला मोठ्याप्रमाणात पसरले आहे. महापालिकेने लागवड केलेली रोपे सुकून गेली आहेत. या बोगद्याच्या माथ्यावर दोन शाळा आहेत. तसेच बोगद्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी नागरिक रिक्षा, दुचाकीने प्रवास करतात. ही वाहने रुळांवर पडण्याची भिती व्यक्त होत आहे. एकूणच बोगद्याला धोका निर्माण झाला असून त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या संदर्भात कळवा प्रभाग समितीचे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना विचारले असता, येथील कचरा हटविण्याचे काम महापालिकेकडून केले जाते, असे त्यांनी सांगितले. तर वन विभागाच्या हद्दीत होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते, असा दावा वन विभागाकडून करण्यात आला आहे.

मागील सहा सात वर्षांपासून पारसिक बोगद्यावरील अतिक्रमणासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. परंतु वन विभाग आणि ठाणे महापालिकेकडून लक्ष दिले जात नाही. हा बोगदा कोसळला तर मोठी जिवीतहानी होईल. हा बोगदा वाचविण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक आहे. – सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना.