१७ जानेवारी रोजी लागू बंधू च्या शोरूममध्ये कार्यशाळा; नोंदणीसाठी आवाहन
मोत्याचे दागिने परिधान करण्यामागची सौंदर्य शास्त्रातील संकल्पना, त्यामागचे शास्त्रीय महत्त्व आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेली गरज या सगळ्याची माहिती देण्याकरिता डोंबिवलीतील लागू बंधूच्या शोरूमध्ये ‘द पर्ल अ‍ॅन्ड डायमंड स्टोरी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
हजारो वर्षांपूर्वीपासून मोत्यांच्या दागिन्यांनी माणसाला भुरळ घातलेली आहे. त्यामुळे मोत्यांचे दागिने परिधान करायला सर्वानाच आवडतात. भारतातील किनाऱ्यांवर वस्ती करणाऱ्या लोकांना पहिल्यांदा मोती मिळाले. त्यांना या मोत्यांची किंमत कळली, कारण ते दुर्मीळ होते. भारतीय तसेच इतर आशियाई संस्कृतीमध्ये मोत्यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. पण, मोत्यांचे महत्त्व फक्त अलंकार बनविणे किंवा सौंदर्य खुलविणे इथपर्यंतच मर्यादित नाही. तर त्याचा आरोग्याच्या दृष्टीने लाभ होत असतो. अशा या बहुगुणी मोती रत्नाबद्दल लोकांना अधिकाधिक माहिती मिळावी, यासाठी शुद्ध हिरे, मोती व रत्नांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले विश्वसनीय ‘लागू बंधू’ हे सेमिनार आयोजित करणार आहेत.
१७ जानेवारी रोजी लागू बंधूंच्या डोंबिवली (पूर्व) येथील शोरूममध्ये हे सेमिनार भरविण्यात येणार आहे. यामध्ये मोती आणि हिऱ्यांच्या दागिन्यांबद्दल परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. जसे खरे मोती, हिरा कसा ओळखावा? त्याची गुणवत्ता कशी ओळखावी? हिऱ्याचे प्रकार कोणते? हिरा खरेदी करताना ४सी म्हणजे कट, कलर, क्लिअ‍ॅरिटी कॅरेट वेट कसे पाहावे? हिऱ्यांच्या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी? अशा असंख्य गोष्टी या सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहेत.
गेली ८० वर्षांपासून ‘मोतीवाले’ म्हणून प्रसिद्ध असलेले लागू बंधू यांनी १९९७ मध्ये हिरे व रत्नांच्या क्षेत्रात प्रवेश केला. तेव्हापासून निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता यांच्या जोरावर ग्राहकांची मनेजिंकली आहेत. हीच परंपरा पुढे चालवत ‘सेमिनार – द पर्ल डायमंड स्टोरी’चे आयोजन केलेले आहे. यामुळे ग्राहकांना मोती आणि हिऱ्यांबद्दल भरपूर माहिती मिळणार आहे. तरी या सेमिनारचा सर्वाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन लागू बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८०६०८८७७ किंवा लागू बंधूच्या फेसबुक इव्हेंटवर नोंदणी करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The pearl diamond story workshop organized in dombivali
First published on: 14-01-2016 at 00:10 IST