कळवा येथील खारेगाव भागात रस्त्याचा काही भाग खचल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने खचलेल्या भागाजवळ अडथळे बसविले आहेत. या मार्गिकेवरील एक वाहिनी सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- त्या’ दोन शौचालयांच्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करा; ठाणे महापालिका आयुक्तांचे कोपरी दौऱ्यादरम्यान आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळव्याहून खारेगाव, मुंब्रा येथे जाण्यासाठी हजारो नागरिक कळवा खारेगाव मार्गाचा वापर करतात. बुधवारी रात्री या रस्त्याचा काही भाग अचानक खचला. त्यामुळे एक मोठा खड्डा या रस्त्यावर पडला आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने खचलेल्या भागाजवळ अडथळे बसविले आहेत. वाहतूक पोलिसांनी येथील एक वाहिनी सुरू ठेवली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.