डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील सर्वाधिक वर्दळीच्या पुर्णिमा ज्वेलर्स दुकानात सोनसाखळी खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका तरूणाने मंगळवारी रात्री दोन साखळी खरेदीचा देखावा करून त्या दुकानात दीड लाखाहून अधिक किमतीच्या दोन सोनसोखळ्या लुटून दरवाजा तोडून पळून गेला.

दुकान मालकाने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण चोरट्याने काचेचा दरवाजा तोडून पळ काढला. सर्वाधिक वर्दळीच्या जुन्या विष्णुनगर पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार घडला आहे. याच दुकान भागात काही महिन्यापूर्वी एका भुरट्याने संध्याकाळच्या वेळेत एका जवाहिऱ्याच्या दुकानात सोन्याचा ऐवज लंपास करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तो भुरटा त्यावेळीही पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

पोलिसांनी सांगितले, माणकचंद माधुलालजी सुराणा (४९) यांचे गुप्ते रस्त्यावर कुळकर्णी ब्रदर्स दुकानाच्या बाजुला पुर्णिमा ज्वेलर्स नावाने दुकान आहे. दुकानात सीसीटीव्ही, दुकानाच्या मुख्य प्रवेशव्दारात ग्राहकाला लोटण्यास जड वाटेल आणि चोर आला तरी तो त्याला झटकन लोटून पळ काढता येणार नाही अशा पध्दतीचा दरवाजा मालक सुराणा यांनी बसवून घेतला आहे.

हेही वाचा >>>ठाणे : कोलशेत खाडी भागातील राडारोड्याचा भराव पालिका काढणार

मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान एक २५ वर्षाचा तरूण आपणास दोन सोनसाखळी खरेदी करायच्या आहेत, असा विचार करून सुराणा यांच्या दुकनात आला. त्याच्या मागणीप्रमाणे माणकचंद सुराणा यांनी तरुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या साखळ्या दाखविण्यास सुरूवात केली. तरूण त्या सोनसाखळ्या गळ्या भोवती लावून आपणास कशा दिसतात याची चाचपणी करत होता. बराच वेळ या तरूणाने आपणास सोनसाखळी खरेदी करायची आहे असा देखावा दुकान मालकासमोर उभा केला.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीतील न्यूओ ऑर्गेनिकच्या कंपनी मालकावर आगी प्रकरणी गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकान मालक सुराणा आणखी काही सोनसाखळ्या तरूणाला दाखवाव्यात म्हणून पाठमोरे होऊन मांडणीवरील सोनसाखळ्या काढत होते. त्यावेळी तरुणाने दुकानदाराचे आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून दुकानात पाहण्यासाठी घेतलेल्या दीड लाखाहून अधिक किमतीच्या दोन सोनसाखळ्या घेऊन पळू जाऊ लागला. दुकानदाराने तात्काळ मंचका बाहेर येऊन तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरूणाला दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील काचेचा दरवाजा उघडता आला नाही. आता आपण पकडले जाऊ या भीतीने तरुणाने काचेच्या दरवाजावर लाथाबुक्क्या मारून दरवाजा तोडला. त्याने पळ काढला. दुकानदाराने चोर म्हणून ओरडा केला पण तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. पोलीस उपनिरीक्षक एल. सी. आंधळे तपास करत आहेत.