कोपरी येथील कन्हैयानगर जलकुंभास नव्याने बसविण्यात आलेली जलवाहिनी मुख्य वितरण जलवाहिनीस जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवारी कोपरी परिसरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
कन्हैयानगर जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा बुधवार, २० जुलै रोजी सकाळी ९ ते गुरुवार, २१ जुलै रोजी सकाळी ९ वाजे पर्यंत असा २४ तास बंद राहणार आहे. या बंदमुळे कन्हैयानगर जलकुंभा अंतर्गत येणाऱ्या कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर व स्वामी समर्थ मठ परिसर या परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.