डोंंबिवली – एकत्रितपणे दारू पित असताना झालेल्या किरकोळ भांडणातून येथील तीन जणांनी फुले नगरमधील एका ४४ वर्षांच्या नागरिकाचा दोन दिवसांपूर्वी खून केला. त्याचा मृतदेह देवीचापाडा येथील खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

सोमनाथ शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. योगेश डोंगरे (४३, मोठागाव), विलन विष्णू टावरे (४१, उमेशनगर), दीपक करकडे (मोठागाव) अशी आरोपींची नावे आहेत. देवीचापाडा खाडीत एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता.

 A gang of six attacked one with a knife over an old dispute in Chembur Mumbai
चेंबूरमध्ये वादातून दोघांवर हल्ला, एकाचा मृत्यू ;  सहा जणांना अटक                                                       
article about controversy over kanwar yatra
लेख : ‘कांवड’वाद शमेल; पण आव्हाने?
Smita Sabharwal
Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्यांचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या, “अपंग सर्जनवर…”
Navi Mumbai Police, Kharghar, Mobile shop theft, Juveniles detained, Stolen goods recovered CCTV footage, Criminal Investigation Department, kharaghar news, navi Mumbai news, latest news,
खारघर येथील चोरी प्रकरणात पावणेचार लाखांच्या मुद्देमालासह तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात 
Anganwadi Workers, Anganwadi Workers Agitation, Unfulfilled Promises , Anganwadi Workers Agitation, latest news, loskatta news,
अंगणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
Kidnap, boy, Nandivali,
कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण

हेही वाचा – कल्याणफाटा भागात आजपासून प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल

हेही वाचा – भाईंदर : मीरा रोड येथील उद्यानात उभारलेली ‘अमर ज्योत’ नऊ महिन्यांतच विझली

मृताच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना डोंबिवलीतील उमेशनगर, मोठागाव भागातून अटक केली. मृत व्यक्ती, आरोपी एकमेकांचे परिचित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे यांना ठार मारले. त्यांचा मृतदेह खाडीत फेकून दिला होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.