करोना महासाथीमुळे दोन वर्ष खंड पडलेला टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मकरोत्सव हा वैविध्यपूर्ण कार्यक्रम २६ ते २९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आहे. जागतिक भान, अध्यात्म, गायन अशी भरगच्च मेजवानी या तीन दिवसांच्या कार्यक्रमात रसिकांना घेता येणार आहे.

हेही वाचा- ठाणे : डोंबिवलीत एकाच रात्री दोन सराफा दुकानांत चोरी, लाखो रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास

डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. २६ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता डोंबिवलीकर निवासी आणि विविध देशांमध्ये समन्वयाची भूमिका बजावणारे दूत संदीप वासलेकर यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर घेणार आहेत. जगातील अस्थिरतेचे वातावरण, वसुधैव कुटुंबकम,‘अ वर्ल्ड विथआऊट वाॅर’ या त्यांच्या पुस्तकांच्या अनुषंगाने वासलेकर आपली मते प्रकट करणार आहेत.
२७ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता काॅर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये मनाच्या श्लोकांमधून माणसाच्या दैनंदिन जीवनातील, कार्पेारेट जीवनातील महत्व सांगणार आहेत. मनाच्या श्लोकांच्या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन होणार आहे. २८ जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता ‘सप्तसूर इंकारित बोले’ हा नाट्यसंगीताची अमृत परंपरा सांगणारा आदित्य बिवलकर यांच्या संकल्पनेतीलकार्यक्रम सादर होणार आहे.

हेही वाचा- ठाणे स्थानकासह तलावपाळी परिसराने घेतला मोकळा श्वास; पालिकेच्या कारवाईमुळे फेरीवाले झाले गायब

रघुलीला एन्टरप्रायझेस यांनी हा कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमात नाट्य संगीत गायक ओमकार प्रभुघाटे, धनंजय म्हसकर, निमिष कैकाडी, केतकी चैतन्य, प्राजक्ता काकतकर हे गायक सहभागी होणार आहेत. त्यांना धनजंय पुराणिक तबल्याची, ऑर्गनवर निरंजन लेले आणि निवेदन अनघा मोडक करणार आहेत.

हेही वाचा- ठाणे : रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमणांवर हातोडा, उल्हासनगर महापालिकेची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकरोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यातील कार्यक्रम भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून केला जाणार आहे. ‘मेरी आवाज ही पहेचान है’ हा हिंदी चित्रपट गाण्यांमधील शास्त्रीय ढंगातील गाण्यांवर आधारित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची संहिता ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांची आहे. शरयू दाते, मधुरा कुंभार, सुस्मिरता डवाळकर गायन करणार आहेत. कमलेश भडकमकर संगीत संयोजन पाहणार आहेत. आर्चिस लेले, अनिल करंजावकर, कृष्णा मुसळे, अमोघ दांडेकर, दिनेश भोसले, अमर ओक, अमित गोठीवरेकर, दीपक वझे वाद्यवृंदाची साथसंगत देणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी अधिक संख्येने येण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी केले आहे.