कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा फलकबाजी करून शहर विद्रूप करणाऱ्यांच्या सामान्यांना तक्रारी करता याव्यात म्हणून पालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. तसेच, भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेश पाठवून तक्रार करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरात सर्व पक्षीयांचे राजकीय पदाधिकारी, त्यांचे समर्थक, गल्लीबोळात तयार झालेले नवतरुण, राजकीय कार्यकर्ते वाढदिवस, त्यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांचे फलक शहरभर लावून शहर विद्रूप करीत आहेत. प्रत्येक रहिवाशाला शहर विद्रूप करणाऱ्याला धडा शिकविण्याची संधी मिळावी म्हणून पालिकेने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत.
सामान्यांकडून आलेल्या तक्रारींची प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी म्हणून त्यांना टॅब उपलब्ध करून दिले आहेत. सामान्यांनी टोल फ्रीच्या किंवा भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशाच्या माध्यमातून केलेली तक्रार प्रभाग अधिकाऱ्याच्या टॅबवर येणार आहे.
टोल फ्री क्र.- १८००५३२३९३९
भ्रमणध्वनी – ९९७०००१३१२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toll free number for complaints against illegal hoarding
First published on: 08-04-2016 at 03:47 IST