scorecardresearch

ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे चार किलोमीटर रांगा

वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबई येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांचे हाल झाले.

traffic jam
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या पावसाचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही झाला. सोमवारी सकाळी मुकुंद कंपनी येथील पूलाखाली पाणी साचले आहे. त्यामुळे मुकुंद कंपनी ते कळवा पूल चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबई येथे कामानिमित्ताने जाणाऱ्यांचे हाल झाले.

आणखी वाचा- ठाण्यात आठ मीमी पाऊस, घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल

ठाणे -बेलापूर मार्गावरून हजारो वाहने नवी मुंबईत जात असतात. मंगळवारी मुकुंद कंपनी येथील पूलाखाली पावसाचे पाणी साचले. त्यामुळे त्याचा परिणाम येथील वाहतूकीवर झाला. मुकुंद कंपनी ते नवीन कळवा पूलापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकजण सुमारे तासभर एकाच ठिकाणी अडकून आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 10:53 IST

संबंधित बातम्या