ठाण्यातील तीनहात नाका परिसरातील कॅश कलेक्शन सेंटरवर आज पहाटे चारच्या सुमारास सात ते आठ जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी जवळपास १२ कोटींची रोकड लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील चौकशी सुरु आहेत. तसेच ठाण्यासह मुंबईतही पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
ठाण्याच्या तीनहात नाका परिसरातील हरदीप सोसायटीमध्ये ठाण्यातील अनेक एटीएमची रोकड जमा करणारी ‘चेकमेट प्रायव्हेट लिमिडेट’ कंपनी आहे. स्टँडर्ड चार्टड, आयसीआयसीआय, यस बँक यांसारख्या नामवंत बँकांना ही कंपनी काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे सात ते आठ अज्ञात इसमांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून रोकड लंपास केली. इतकेच नाही तर दरोडेखोरांनी सीसीटीव्ही सेटअपसह पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unidentified armed men loot cash worth approx rs 12 crores from atm cash van in thane
First published on: 28-06-2016 at 11:31 IST