ठाणे : ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये उद्या, शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमानंतर ते शहरात दोन ठिकाणी भेटी देण्याबरोबरच शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महिनाभरातील हा त्यांचा दुसरा ठाणे दौरा असून आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे दौरे राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जात आहेत. ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय असून येथून आता बा‌ळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपुर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाचे या भागात मंदीर आहे.

The plight of workers in coalition politics in Raigarh
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरपट
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
Narendra Modi, Kanhan, Nagpur,
‘बेरोजगारी, महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिर…’, कन्हान येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत

हेही वाचा >>> ठाणे : कामगार नेते राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्ष कार्यालयात चोरीचा प्रयत्न

या मंदीरामध्ये जैन समाजाच्यावतीने शनिवारी सकाळी ८ वाजता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज यांच्या दौऱ्याची तयारी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केली आहे. जैन मंदीरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. यानंतर ते ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.