ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत पुढील वर्षांत होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वग#दाखला, दोन स्टॅम्प साइज छायाचित्र आणि आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्यात येणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी २ जुलैला सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यानंतर २० जुलैला सायंकाळी ५ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.  वर्तकनगर येथील चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत येथे  संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.