tv11
thlogo06घर सोडून बाकी सर्व कमालीचे महाग असलेल्या दिवावासीयांचा दिवस उदरनिर्वाहासाठी काबाडकष्ट करण्यात जातो, तर रात्र चक्क जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी मिळविण्यात जाते. नोकरी-व्यवसायासाठी मुंबई आणि कर्जतच्या दिशेने गर्दीच्या लोकलमधून दमूनभागून घरी परतलेले चाकरमानी गर्दी थोडी कमी झाल्यावर पाणी भरण्यासाठी सहकुटुंब घागरी, बादल्या घेऊन चक्क मुंब्रा स्थानक गाठतात. उन्हाळा असो वा हिवाळा बारा महिने तेरा काळ यांना पाण्यासाठी असा द्राविडीप्राणायाम करावाच लागतो. ‘उद्या लागणारे पाणी आज भरल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही’, असे येथील एक महिला गमतीने म्हणाली. जगण्यातला हा संघर्ष अधिक सुसह्य़ व्हावा म्हणून कण्हत बसण्यापेक्षा गाणे म्हणून आला प्रसंग साजरा करण्याच्या दिवावासीयांच्या लढाऊ वृत्तीला सलामच करायला हवा. गेल्याच आठवडय़ात अशाच प्रकारे पाणी भरताना एकाचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू झाला.तरीही पाण्यासाठी शेकडोंना करावी लागणारी पायपीट काही थांबली नाही. उद्याची तहान भागविण्यासाठी आज कुठूनही पाणी त्यांना आणावेच लागते.
दीपक जोशी