कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद | Water supply to Kalyan city closed on Tuesday abn 97 | Loksatta

कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

मंगळवारी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद होणार आहे

कल्याण शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिकी आणि विद्युत उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी येत्या मंगळवारी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणीपुरवठा कल्याण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली.

कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली, कोळसेवाडी, विजय नगर, चिंचपाडा, नेतीवली, तिसगाव, चक्की नाका परिसर, कल्याण पश्चिमेतील पारनाका, बाजारपेठ, बैलबाजार, मुरबाड रोड, चिकणघर, गांधारे, बारावे, बेतुरकर पाडा, खडकपाडा, आधारवाड,  मोहने, आंबिवली, बिर्ला महाविद्यालय परिसर, नवीन कल्याण परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी दुरुस्तीचे काम असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी मुबलक पाणीसाठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2022 at 20:25 IST
Next Story
मोठी बातमी! ईडीचा पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांना दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त