पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्य़ामधील एका २४ वर्षीय विवाहितेची मुंबईत ५० हजाराला विक्री करून तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पाच जणांविरोधात शनिवारी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दार्जिलिंग जिल्ह्य़ातील एका गावात राहणारी पीडीत महिला कामाच्या शोधात होती. गावातील परिचित सीमा बाला हिने मुंबईत नोकरी लावते, असे सांगून संजय अली याच्याशी तिची ओळख करून दिली. त्याने महिना १० ते १२ हजार रुपये घरकामाची नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील नाहूर भागात आणले. तेथे सलमान व त्यांच्या पत्नीला ५० हजार रुपयांना विकले. या दोघांनी तिला एका घरात डांबून ठेवले व तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी धाड टाकून पीडीत महिलेची सुटका केली. तसेच याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करत नीला नायक या महिलेला अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2015 रोजी प्रकाशित
विवाहितेची विक्री करणाऱ्या महिलेस अटक
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्य़ामधील एका २४ वर्षीय विवाहितेची मुंबईत ५० हजाराला विक्री करून तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पाच जणांविरोधात शनिवारी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
First published on: 02-02-2015 at 02:59 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman arrested for human trafficking