ठाणे : भरदुपारी घरात बांधकाम करणाऱ्या कुटुंबाला काम बंद करण्याची विनंती करणाऱ्या महिलेला दोघांनी लिफ्टमध्येच बेदम मारहाण केली. या गुन्ह्य़ातील आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक दोन येथील कोर्टयार्ड गृहसंकुलातील गोयल कुटुंबीयांच्या घरात दुपारी २ ते ४ दरम्यान अंतर्गत सजावटीचे काम सुरू होते. त्यांच्या सदनिकेशेजारी राहणाऱ्या महिलेने गोयल यांना दुपारच्या वेळेत काम करू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने गोयल कुटुंबातील एक महिला आणि तिच्या मुलाने या महिलेला लिफ्टमध्ये बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.  हा सर्व प्रकार इमारतीच्या लिफ्टमधील सीसीटीव्हीत चित्रीत झाला असून या प्रकरणी संबंधित महिलेने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या महिलेवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून  घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना केवळ नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman beaten in thane in high profile housing society zws
First published on: 05-12-2021 at 03:21 IST