ठाणे : राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर गेलेले ४० आमदार आणि आता सत्तेत सामील झालेले असे सर्व जण आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी गुरुवारी सकाळी कळवा रुग्णालयाचा दौरा केला. यामध्ये त्यांनी रुग्णालयात १८ उपचाराधीन रुग्णांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा आढावा रुग्णालय प्रशासनाकडून घेतला. आरोग्य यंत्रणेच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. कळवा रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत, असा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

कळवा रुग्णालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिकांची कमतरता आहे. त्यामुळे हे रुग्णालय महापालिकेला चालवता येत नसेल तर त्यांनी रुग्णालय शासनाकडे द्यावे. रुग्णालयात जुनीच यंत्रणा कार्यान्वित असून अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेकरांना उत्तम दर्जाच्या रुग्णालयाची स्वप्ने दाखवतात. रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फतही चौकशी करावी. या घटनेत मृत पावलेल्यांच्या वारसदारांना किमान दहा लाखांची मदत तात्काळ दिली जावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work by the rulers to fill their own coffers the allegation was made by opposition leader vijay wadettiwar ysh
First published on: 18-08-2023 at 00:01 IST