भारतात इस्रायलच्या स्टुडंट युनियन द कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अकॅडमिक स्टडीजच्या विद्यार्थ्यांकडून पालघर जिल्ह्य़ाच्या वाडा जिल्हा परिषद शाळेची भिंत रंगवली जात असून ते शाळेची डागडुजी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्त्रायलमधील स्टुडंट युनियन द कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अकॅडमिक स्टडीजच्या विद्यार्थ्यांचा चमू पालघर जिल्ह्य़ातील वाडा शहरात दाखल झाले असून दोन आठवडय़ांपासून ते वाडा शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व जिल्हा परिषद शाळा नंबर २ या दोन्ही शाळेतील बाहेरील भिंती, वर्गखोल्यांची रंगरंगोटी व डागडुजी करीत आहेत. तसेच हा उपक्रम पाहण्यासाठी मुलांसह पालकवर्गाची गर्दी होताना दिसत असते.आम्ही या अगोदर  हृषीकेश येथे मुलांच्या शाळेत अशा प्रकारचे काम केले असून आमच्या चमूने नेपा, फिलीपाइन्स, टांजानिया अशा ठिकाणी भेटी दिल्या आहेत, अशी या टीमचे प्रमुख अ‍ॅलोन मिझराही यांनी यावेळी बोलताना माहिती दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work in zilla parishad school from israeli students
First published on: 25-08-2018 at 01:49 IST