तिसऱ्या, चौथ्या मार्गिका उभारणीची योजना ढिम्म

मुंबई : ठाणे, कल्याणपुढील लोकल प्रवास सुकर करण्यासाठी १५ डबा लोकलचा विस्तार करण्याचे मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे स्वप्न धूसर झाले आहे. कल्याण ते कसारा-बदलापूर या तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठीचे काम रखडले असून गेल्या दोन वर्षांत भूसंपादनात अजिबात प्रगती झालेली नाही. कल्याण ते कसारा मार्गिके त ३६ हेक्टरपैकी जेमतेम ४.२० हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. या मार्गिका पूर्ण झाल्याशिवाय कल्याणपुढेही १५ डबा लोकल धावू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण ते कसारा कर्जतदरम्यान सध्या दोन मार्गिका असून त्यावरून लोकल गाडय़ा व एक्स्प्रेस धावतात. परंतु या सेवांचे वेळापत्रक दोनच मार्गिकांवरून सुरळीत ठेवताना रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडते. लोकल विस्कळीत झाल्यास पर्यायी मार्गिकाही नसल्याने वेळापत्रक सुरळीत ठेवता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण ते कसारादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पाच वर्षांपूर्वी २०१६मध्ये अर्थसंकल्पात या कामाला मंजुरीही देण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळानेही कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यासाठी दोन वर्षांपूर्वी काम हाती घेतले. मात्र, यापुढे काहीही प्रगती झालेली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of third and fourth railway line from kalyan to kasara badlapur stalled zws
First published on: 02-07-2021 at 01:07 IST