अंबरनाथ तालुक्यातील भाल येथील आयडियल महाविद्यालयाच्या बाहेर गुन्हेगार वृत्तीच्या माथेफिरू तरुणाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर धारदार पातेने हल्ला करण्याचा बुधवारी प्रयत्न केला. या विद्यार्थीनीच्या मैत्रिणी मध्ये पडल्या म्हणून विद्यार्थीनी थोडक्यात बचावली. त्यानंतर माथेफिरू तरुण तेथून पळून गेला.माथेफिरू तरुणाने तीन वेळा महाविद्यालया बाहेर येऊन पीडित अल्पवयीन विद्यार्थीनीला पळून नेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थीनीने शिताफीने त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. या तरुणाकडून घातक कृती होण्याची भीती असल्याने या विद्यार्थीनीचे पालक दररोज तिला महाविद्यालयात सोडण्यास येत आहेत.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवशी चार दुचाकी वाहनांचा चोऱ्या

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

बुधवारी तरुणाने विद्यार्थीनीवर धारदार पातेने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हिललाईन पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार केली. पोलिसांकडून कारवाई न झाल्याने गुरुवारी माथेफिरू तरुण पुन्हा महाविद्यालया बाहेर येऊन तरुणीवर हल्ल्याचा किंवा तिला पळून नेण्याचा प्रयत्न केला. इतर विद्यार्थ्यांनी हस्तक्षेप केल्याने त्याचा प्रयत्न फसला. विद्यार्थ्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली तरी पोलिसांकडून कारवाई झाली नाही.पीडीत मुलगी १५ वर्षाची आहे. ती अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी परिसरात राहते. मागील वर्षी याच भागात राहत असलेल्या मंगेश सोनावणे या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मंगेशला अहमदनगर येथून अटक करुन त्याच्या ताब्यातील पीडित मुलीची सुटका केली होती. या प्रकरणी पोलिसांनी मंगेश बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली होती. तो नऊ महिने तुरुंगात होता. तो अलीकडेच बाहेर आला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील बालभवनमधील गुलाब पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ; एक हजाराहून अधिक गुलाब पुष्पे प्रदर्शनात

पीडित मुलीला तु माझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार का केली. तुझ्यामुळे मला तुरुंगात जावे लागले असे प्रश्न करुन मंगेश पुन्हा पीडित मुलीला त्रास देत आहे.बुधवारी पीडित मुलगी शिकत असलेल्या आयडियल महाविद्यालयाच्या बाहेर आरोपी मंगेश आला. ती महाविद्यालयातून बाहेर येताच तिचा हात पकडून तिला खेचून नेऊन तिला धारदार पातेचा दाखवत होता. इतर विद्यार्थी पीडितेच्या मदतीला म्हणून मंगेश पळून गेला. जाताने त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी दिली.हिललाईन पोलीस ठाण्यात मंगेश विरुध्द तक्रार करण्यात आली. त्याच्यावर ३५४ ड अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. मंगेश सराईत गुन्हेगार, माथेफिरू आहे हे पोलिसांना मुलीच्या पालकांनी सांगुनही पोलिसांनी कारवाई केली नव्हती.शुक्रवारी पीडिता महाविद्यालयात गेली. आरोपी मंगेश पुन्हा तेथे आला. पीडित मुलीची मैत्रिण मंगेशचे चित्रीकरण करू लागताच मंगेशने तिला मारहाण केली. हा प्रकार विद्यार्थ्यांनी पोलिसांना कळविला.

हेही वाचा >>>ठाणे: गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सराफा दुकानात पोलीस अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याला मारहाण

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन मंगेशला ताब्यात घेतले. मंगेशवरील कारवाईसाठी पोलीस करत असलेल्या टाळाटाळीबद्दल विद्यार्थी, पालक संताप व्यक्त करत आहेत. मुलीसोबत तिच्या मैत्रिणी नसत्या तर काही अनर्थ घडू शकला असता असे पीडितेच्या पालकांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘आम्ही आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याच्यावर कडक कारवाई जाणार आहे.’-श्रीराम पडवळ,साहाय्यक पोलीस निरीक्षक,हिललाईन पोलीस ठाणे</strong>