वनौषधी या औषधी गुणधर्म धारण करणाऱ्या असतात. जगात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. पण कर्करोग होऊच नये, यासाठी काही वनौषधी आधीपासूनच वापरता येतील का, यावर संशोधन झाले आहे. आरोग्यकारक अन्न सेवन केल्याने कर्करोगाला नक्की अटकाव होतो. त्यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. काही फायटोकेमिकल्स हे कर्करोगकारक द्रव्यांना अवयवांच्या उतींवर हल्ला करण्यापासून रोखतात. अशा काही काही वनस्पतींचे गुणधर्म आपण पाहू.
* रोझमेरी(लालतेरडा) रोझमेरीचा अर्क घेतल्याने कर्करोगास अटकाव होतो. कारण त्यात कार्नोसिक व रोझमारिनिक नावाची संयुगे असतात. त्यामुळे पूरस्थ ग्रंथी (प्रॉस्टेट) फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग होण्यास प्रतिबंध होतो. केमोथेरपीच्या औषधांना कर्करोगाकडून होणारा विरोध कमी होतो.
*  हळद
रोजच्या आहारातील हा पदार्थ आहे. त्यात क्युरक्युमिन असते व ते औषधी असते. कर्करोगाच्या गाठींना रसद पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ते नष्ट करते. त्यामुळे कर्करोगग्रस्त पेशी वाढू शकत नाहीत. क्युरक्युमिनमुळे मेटास्टॅटिस क्रिया रोखली जाते.
* लसूण
लसणात ऑरगॅनोसल्फर संयुग असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती व कर्करोग विरोधी गुण वाढीस लागतात. आतडे,स्तन,गर्भाशय यांच्यातील कर्करोग वाढीस प्रतिबंध होतो. लसणामुळे कर्करोगकारक नायट्रोसॅमाइन संयुग निर्माण होण्यास अटकाव होतो.
* काळे मिरे  (ब्लॅक पेप्पर)
 यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.त्यामुळे कर्करोगपेशींची वाढ कमी होते. आरोग्यकारक पेशींना इजा होत नाही.
* ओवा
कर्करोगाच्या गाठींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या तयार होण्यापासून रोखण्याची व्यवस्था पार्सलेमधील नैसर्गिक तेलाने होते.
* जिरे
थायमोक्विनोन हा घटक क्युमिनच्या तेलात असतो. त्यामुळे अँटीऑक्सिडंट व रसायन प्रतिबंधक गुण त्यात असतात. थायमोक्विनोनमुळे प्रॉस्टेट व ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) व स्तनाचा कर्करोग यांच्या पेशींची निर्मिती थांबते.
* लाल मिरची
 यामुळे वजन व रक्तदाब कमी होतो,तसेच कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. हा मिरच्यांचा प्रकार असल्याने त्यात कॅपझायसिन हा
घटक असतो, तो प्रॉस्टेट कॅन्सरला रोखतो.
* ओरेगॅनो-
यात कारव्हॅक्रॉल नावाचा रेणू असतो. त्यामुळे कर्करोगाचा प्रसार कमी होतो. कर्करोगाला कारण ठरणाऱ्या हेटरोसायक्लिक अपाइन्स या
रसायनांचा धोका त्यामुळे टळतो. मांस जाळले तर या रसायनांची निर्मितीहोत असते.
* केशर
केशरात क्रोसेटिन हा कर्करोगविरोधी घटक असतो. कर्करोगाच्या पेशींची वाढ यात रोखली जाते. पातळ स्वरूपात केशर दिले तर त्वचेतील कर्करोगकारक घटकांना प्रतिबंध होतो.
* दालचिनी
कर्करोगग्रस्त पेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची निर्मिती यामुळे थांबवली जाते. एच.पायलोरी या पोटाच्या कर्करोगास कारण ठरणाऱ्या जीवाणूची वाढ रोखली जाते. रोज चिमूटभर दालचिनी सेवन केली तरी कर्करोगापासून संरक्षण मिळते.
* पुदिना
रोजच्या वापरातील हा पदार्थ असून, त्यात फायटोकेमिकल्सअसतात. ही रसायने कर्करोगकारक पेशींचा रक्तपुरवठा रोखतात.त्यामुळे कर्करोग पेशी ऑक्सिजन व पोषके न मिळाल्याने मरतात
* कोथिंबीर
लहान आतडय़ाचा कर्करोग रोखण्यास गुणकारी असते. त्यामुळे आतडय़ातील विषे कमी होतात. कोलेस्टेरॉल कमी होते. आतडय़ातील
मेदाचे घातक परिणाम कमी केले जातात. त्यामुळे कर्करोग होत नाही.
* शेपू
यात औषधी गुण असतात. मोनोटेरेपिन्स ही संरक्षक संयुगे त्यात  असतात. त्यातून अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेली वितंचके पाझरतात.
मुक्तकणांना रोखले जाऊन कर्करोगाचा धोका कमी केला जातो.
* आले
आल्यात जिनेरॉल, जिंजरोन ही संयुगे असतात.त्यात अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात.त्यामुळे कर्करोग पेशींची वाढ होत नाही.आल्यामुळे दोन दिवसांत कर्करोगाच्या पेशीनष्ट होतात. ऑटोफॅगी संयुगेकर्करोगपेशी नष्ट करतात.त्यात या पेशी स्वत:च स्वत:ला खातात.
* फेनेल (बडीशेप)
यात फायटो न्युट्रिएंट्स (पोषके) असतात. ती अँटीऑक्सिडंट असतात. त्यातील अ‍ॅनेथोल या संयुगाने कर्करोगपेशींची भेदन व चिकटण्याची
क्षमता कमी होते. कर्करोग पेशींची संख्या वाढवणाऱ्या वितंचकांची क्रिया कमी होते.