17 February 2020

News Flash

ट्रेक डायरी : व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’

हिमालय म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. बर्फाच्छादीत पर्वत, खोल वाहत्या नद्या, सूचीपर्णी वृक्षांचे जंगल, दऱ्याखोऱ्यातील गावे आणि विविध रंगांत न्हाहून निघणारे आकाश या साऱ्यांमुळे इथला

| June 25, 2015 12:01 pm

हिमालय म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच म्हणावा लागेल. बर्फाच्छादीत पर्वत, खोल वाहत्या नद्या, सूचीपर्णी वृक्षांचे जंगल, दऱ्याखोऱ्यातील गावे आणि विविध रंगांत न्हाहून निघणारे आकाश या साऱ्यांमुळे इथला निसर्ग प्रेमात पाडत असतो. या साऱ्यांमध्ये हिमालयात फुलणारी खोरी हाही एक आकर्षणाचा विषय असतो. या फुलांच्या बहरासाठी हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३२५० मीटर उंचीवर आहे. या खोऱ्यामध्ये जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये हजारो प्रकारची फुले उमलतात. फुलांचा हा बहर पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो भटके या खोऱ्याची वाट तुडवत इथे येतात. या खोऱ्यात फुलांशिवाय विविध प्रकारचे पक्ष्यांचेही दर्शन घडते. या भटकंतीमध्येच ‘हेमकुंड साहिब’ या शिखांच्या पवित्र स्थानासही भेट देता येते. इथे एक सुंदर तलावही आहे. बर्फाच्छादीत पर्वत, फुलांनी भरलेली खोरी, नितळ पाण्याचे तलाव हे सारेच या भटकंतीत लक्ष वेधून घेते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. अशा या ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ ट्रेकचे हिमगिरी ट्रेकर्स फाउंडेशनतर्फे १ ते ७ ऑगस्ट, १५ ते २४ ऑगस्ट दरम्यान आयोजन केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
सायकल मोहीम
‘एसपीआर’तर्फे येत्या पुणे येथे रात्रीच्या सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

वरंधा घाट, शिवथरघळ वर्षां सहल
‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या २८ जून रोजी भोरचा राजवाडा, भाटघर धरण, वरंधा घाट, शिवथरघळ परिसरात वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटेल! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email – abhijit.belhekar@expressindia.com

First Published on June 25, 2015 12:01 pm

Web Title: trek diary 73
Next Stories
1 रतनवाडीचा अमृतेश्वर
2 स्वर्गारोहिणी
3 ‘गिरिप्रेमी’चे ‘आव्हान’!
Just Now!
X