कास पठार हे विविध प्रकारच्या रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘हिरवाई’तर्फे येत्या २३ आणि २४ सप्टेंबर रोजी या पठारावर अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. याजोडीने ठोसेघर धबधबा आणि चाळकेवाडीला भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कास पठार, सज्जनगड
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २० सप्टेंबर रोजी पावसाळी रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर वर्षां सहलीचे आयोजन केले आहे. यामध्ये कासशिवाय सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्याच्या सहलीचाही समावेश आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

सडा किल्ला पदभ्रमण
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान गोव्या जवळील सडा किल्ला परिसरात पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. या मोहिमेत निसर्गरम्य सडा गाव, सडा किल्ला जवळीलच सडा धबधब्यास भेट दिली जाणार आहे. या परिसरात असलेल्या गुहांना या मोहिमेत भेट दिली जाणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com